बलसागर भारत होवो , विश्वात शोभुनी राहो : भुसावळ शहर व परिसरात स्वातंत्रदिन अमृत महोत्सव उत्साहात साजरा ; ७५ मीटर लांबीच्या ‘तिरंग्याची काढली सन्मान संचलन रॅली’ : नागरिकांचा प्रचंड उत्साह :

भुसावळ – स्वातंत्राच्या 75 वा अमृत महोत्सव भुसावळकरांनी अत्यंत उत्साहात व आनंदाने साजरा केला . गेल्या 3 दिवसांपासून ‘ हर घर तिरंगा ‘ या संकल्पनेला परिपूर्ण साथ देत विविध सेवाभावी संस्था , शाळा , महाविद्यालये , शासकीय निम्शासकीय कार्यालय यांच्या तर्फे जनजागृती रॅली व विविध कार्यक्रम घेण्यात आले .

15 ऑगष्ट तिरंग्याला मानवंदना : वरुण राजाचीही दमदार हजेरी :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज सकाळी शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी ध्वजास मानवंदना दिली यावेळी आमदार संजय सावकारे , तहसीलदार महेंद्र धिमते , न पा मुख्याधिकारी संदिप चिद्रवार , यांचेसह नगरसेवक , पोलिस अधिकारी व कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक ,जेष्ठ स्वातंत्र सैनिक यांचेसह शासकीय कार्यालयीन अधिकारी , कर्मचारी , शिक्षक , विद्यार्थी , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
प्रसंगी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनीं सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले . यात साकरी येथील जनता विद्यालय विद्यार्थिनीनी न डगमगता भर पावसात अतिशय सुंदर लेझिम नृत्य सादर केले .
७५ मीटर लांबीच्या ‘तिरंग्याची काढली सन्मान संचलन रॅली‘ :
दरम्यान शहरातून होमगार्ड पथक व अर्जुना संघटनेतर्फे ७५ मीटर लांबीच्या तिरंग्याची भव्य ‘तिरंगा सन्मान संचलन रॅली’ काढण्यात आली.
रॅलीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून प्रारंभ झाला . शहराच्या प्रमुख मार्गावरुन रॅली मोठ्या दीमाखाने निघाली रस्त्याने नागरिकांनी मोठ्या उत्साहात व आनंदाने तीरंग्याचे पुष्पवृष्टि करूनस्वागत करून सन्मान केला . रॅली नाहाटा कॉलेज जवळ विसर्जीत करण्यात आली.
रॅली प्रारंभ व विसर्जित दरम्यान संपूर्ण वेळ धो धो पाऊस पडत असतांनाही शहरवासियांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला . व तिरंग्याची आण बाण व शान वाढवून आनंद साजरा केला .