वरणगांव आयुध निर्माणीत सहप्रबंधकाला मारहाण पोलीसात गुन्हा दाखल :

वरणगाव – येथील आयुध निर्माणीत कार्यरत असलेले सह प्रबंधक यांच्यावर उप प्रबधक यांनी मारहाण करून जखमी केले आहे हि घटना दुपारी पावणे बारा वाजेच्या दरम्यान युध्द साहित्य कारखान्यात घडली असून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

वरणगांव आयुध निर्माणीत नेहमी काही करणामुळे छोटे छोटे वाद सुरू असतात. मात्र या वादाकडे महाप्रबंधक दुर्लक्ष करीत असल्याने दिवसेन दिवस त्यांची हिम्मत वाढत आहे. जर आधीच महाप्रबंधकांनी लक्ष दिले असते तर आज सह प्रबंधक .एस. आर. पाटील यांना ज्युनियर अमृतपाल यांनी पेपर वेट मारून फेकले नसते.आज या घटनेमुळे सह प्रबंधक एस. आर. पाटील यांना शिविगाळ केली डोक्याला पेपर वेट मारला व बोटावर पेपर वेटने मारले . या घटनेत पाटील यांना दोन टाके पडल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली. सह प्रबंधक एस. आर. पाटील यांना आयुध निर्माणी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. डॉ. समीर यांनी उपचार करून भुसावळ खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले .
याबाबत पोलीस मिळालेल्या माहितीनुसार वरणगाव आयुध निर्माणी मधील उप प्रबधक पदावर असलेले शैलेश पाटील हे कर्तव्यावर असताना त्यांनी अमृता पाल या अधिकाऱ्यास तुम्ही ड्युटी वरून गायब का झाले होते याबाबत विचारणा केली असता अमृत पाल याने पाटील साहेबांच्या केबिन मधील पेपर वेट उचलून त्यांच्या डोक्यावर बोटावर मारलेला आहे यामुळे पाटील यांच्या डोक्याला दोन टाके बसलेले असून उजव्या हाताचे दोन बोटाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते तसेच भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात सिटीस्कॅन करण्यात आले असून तो रिपोर्ट अजून बाकी आहे अमृत पाल येणे मारल्यानंतर कार्यालयासमोर युनियन पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्यानंतर अमृत पाल यांनी भुसावळ येथे रेल्वे कॉलनी घरी निघून गेले होते .
परंतु फिर्याद दाखल झाल्यानंतर वरणगाव पोलिसांनी अमृत पाल यास ताब्यात घेतले आहे . या प्रकरणी शैलेश रामचंद्र पाटील वय ५१ रा रेणूका नगर वरणगाव पोलीस स्टेशनला भारतीय दंड विधान १५६ / २२ भां द वी कलम ३२६ , ५०४ प्रमाणे अमृत पाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एपीआय आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय परशुराम दळवी करीत आहे

जखमी एस आर पाटील
प्राथमिक उपचार सुरू असतांना दवाखान्यामध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी होती.ही माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी मिळताच त्यांनी तत्काळ दवाखान्यात पोहचून सिनियर डीजीएम एस.आर.पाटील यांची भेट घेतली.लवकरच संजय खन्ना ऑडनन्स फॅक्टरीचे महाप्रबंधक यांना ज्युनियर डीजीएम अमृत पाल यांना निलंबित करण्याचे पत्र देणार असल्याची माहिती दिली.