कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचे भुसावळातील उद्योजक मनोज बियाणी यांनी केले स्वागत:


पाळधी : कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेले गुलाबराव पाटील यांचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. भुसावळातील उद्योजक मनोज बियाणी यांनी पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांचे बुके देवून स्वागत केले. प्रसंगी विनोद बियाणी, राजेश पारीख, रुपेश तिवारी आदींची उपस्थिती होती.

कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य
मंत्री गुलाबराव पाटील यांनी लागोपाठ तिसर्‍यांदा मंत्रीपदाची तर दुसर्‍यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोषात याचा आनंद साजरा केला होता. यानंतर शनिवार, 13 ऑगस्ट रोजी ते जिल्ह्यात पहिल्यांदा येणार असल्याचा दौरा अधिकृतपणे जाहीर होताच त्यांच्या अभूतपुर्व स्वागताचे नियोजन करण्यात आले. गुलाबराव पाटील हे शनिवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून निघाले. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चोपडी कोंडव्हाय फाटा येथे त्यांची जळगाव जिल्ह्यात एंट्री झाली. फटाक्यांची जोरदार आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गगनभेदी घोषणांनी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या हजारो समर्थकांनी गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले तर पाळधी येथेदेखील त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.