भुसावळ( प्रतिनिधी) -कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व भुसावळ कला विज्ञान आणि पु . ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त येत्या दि .9 ऑगस्ट 2022 मंगळवारी रोजी ‘एक शाम देश के नाम’ देशभक्तीपर गीतांचा भव्य कार्यक्रम होणार आहे .सदर कार्यक्रम हा संतोषीमाता हॉल प्रोफेसर कॉलनी ,जामनेर रोड भुसावळ येथे होईल . या प्रसंगी माजी सैनिकांचा सत्कार होणार असून यात माजी सैनिक गोपाल बा-हे, प्रभाकर झांबरे , प्रल्हाद नारखेडे, किशोर भारंबे या सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार होणार आहे . यात ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ . मोहन भाऊ फालक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील .तर आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ . सुनील कुलकर्णी , ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश भाऊ फालक , सेक्रेटरी विष्णू भाऊ चौधरी , कोषाध्यक्ष संजयजी नाहाटा ,प्राचार्य डॉ . एम. व्ही.वायकोळे उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील उपप्राचार्य डॉ.बी.एच.बराटे उपप्राचार्य डॉ.ए. डी.गोस्वामी उपप्राचार्य डॉ एन.ई .भंगाळे आदी उपस्थित राहणार आहेत . सदरहू कार्यक्रम सर्व भुसावळ वासीयांसाठी खुला आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे . असे आव्हान विद्यार्थी विकास अधिकारी डॉ . किरण वारके, समन्वय प्रा . एस.टी. धूम यांनी केले आहे



