नाहाटा महाविद्यालयात 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी ) – देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण होत असल्याने देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे . देशावर जवळ जवळ दोनशे वर्ष ब्रिटिशांनी साम्राज्य केले या कालावधीत भारतीयांचे मोठ्या प्रमाणावर शोषण केले गेले . देशाचा विकास न होता ,अधोगती झाली . यांचा विरुद्ध स्वातंत्र्याचे लढे सुरू झाले . लढे होते स्वातंत्र्याचे , स्वाभिमानाचे, आत्मविश्वासचे , इंग्रजांचा जस – जसा अन्याय, अत्याचार वाढत होता याचा विरुद्ध स्वातंत्र्याचे लढे अधिक पेटत होते .स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी हसत हसत गळ्याला फास लावून घेतले . तर काहींनी आपल्या संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी झोकुन दिले .भगतसिंग, राजगुरू,आणि सुखदेव असे एक नाही तर अनेकांनी बलिदान दिले .महात्मा गांधी , पंडित जवाहरलाल नेहरू , स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ . बाबासाहेब आंबेडकर अशा हजारो महापुरुषांनी स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिले . अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांना भारतातून पराभूत करून बाहेर जाण्यास भाग पाडले . आज या ऐतिहासिक क्षणाला 75 वर्ष पूर्ण होत आहे . या निमित्ताने 75 वर्षाच्या कालावधीत स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वच क्षेत्रात बदल झालेला आहे . याबदलांचा शोध निबंधाच्या माध्यमातून समाजासमोर लेखाजोखा मांडता यावा या उद्देशाने या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ . श्री . मोहन भाऊ फालक अध्यक्षस्थानी असतील . यावेळी मुक्ताईनगर येथील जी .जी . खडसे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ . व्ही . आर . पाटील उद्घाटक म्हणून उपस्थित असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन मा. श्री . महेशभाऊ फालक संस्थेचे सेक्रेटरी मा .श्री .विष्णूभाऊ चौधरी कोषाध्यक्ष मा . श्री . संजयजी नाहाटा उपस्थित राहणार आहेत . यांच्या समावेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सौ . एम . व्ही . वायकोळे, उपप्राचार्य डॉ . बी . एच . ब-हाटे, उपप्राचार्य डॉ . एस . व्ही . पाटील, उपप्राचार्य डॉ . एन . ई . भंगाळे उपस्थित राहणार आहेत . राष्ट्रीय परिषदेत ११५ शोध निबंधाचे वाचन केले जाणार असून संशोधक, प्राध्यापकांनी परिषदेत उपस्थित राहून परिषद यशस्वी करावी .असे आवाहन आयोजक उपप्राचार्य प्रा . डॉ . ए .डी . गोस्वामी ,समन्वयक डॉ . प्रफुल्ल इंगोले प्रा . एस . के . राठोड आणि सर्व आयोजन समितीचा चेअरमन व सदस्यांनी केले आहे .