भुसावळ एमएसईबी चा भोंगळ कारभार : डीपीवरुन तुटलेल्या वायरीमुळे धोका : नागरिक भयभीत


भुसावळ –
येथील नसरवांनजी फाईल भागात असलेल्या विज वाहक डीपी वर दिनांक २२जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास विज वाहक तार (वायर ) तुटून पडली आहे . याबाबत संबंधित विज वितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे कडे रितसर तक्रार करून सूचना दिली . मात्र विज वाहक वायर जोडण्यास आज 21 जुलै रोजी सुद्धा सकाळी 9 वाजेपर्यंत संबंधित कोणीही अधिकारी वा कर्मचारी आले नाही .
पावसाळ्यामुळे या परिसरातील अवस्था अत्यंत दयनीय आहे अश्या परिस्थितीत अश्या तूटलेल्या अथवा लोबंकळणाऱ्या वायरीमुळे नुकसान होवू शकते मानवी हानी सुद्धा होवू शकते त्यामुळे याला जबाबदार संबंधित अधिकारी राहतील तसेच निष्क्रिय अधिकारी यांचेवर कारवाई व्हावी अशी मागणी जळगाव जिल्हा कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मुनव्वर खान यांनी केली आहे .