रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे वृक्षरोपणाचा प्रोजेक्ट : ५० रोपांचे रोपण करून संगोपन करण्याचा निर्धार :


भुसावळ – येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे वृक्षसंवर्धन ही काळाची अत्यावश्यक गरज असल्याचे लक्षात घेवून वृक्षरोपणाचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे . त्या अनुषंगाने नुकतेच ५० रोपांचे रोपण करण्यात आले .
स्थानिक गोविंद फालक नगर परिसरात बेल, कडू बदाम,
जांभूळ, आवळा, कडुनिंब आदीं औषधीयुक्त झाडांची रोपे लावण्यात आली याच बरोबर केवळ रोपण न करता त्या सर्व रोपांचे संगोपन करण्याची देखील जबावदारी रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे घेण्यात आली असल्याचे अध्यक्षा नूतन फालक यांनी सांगीतले .
यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली
डीजी राजीव शर्मा , प्रेसिडेंट नूतन फालक , पीपी रश्मी शर्मा , सी ए मुकेश अग्रवाल , रो. हिरामण फालक आदीं उपस्थित होते .