१४ वर्षिय मतीमंद मुलीवर अत्याचार ; नराधम पोलिसांच्या जाळयात :


यावल – घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका मतिमंद 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास यावल पोलिसांनी अटक केली तालुक्यातील एका लहानशा गावात 14 वर्षीय मतिमंद मुलीवर ती मतिमंद असल्याचा गैरफायदा घेत एका नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार 13 जुलै रोजी यावल तालुक्यात घडला.
याबाबत यावल पोलिसात संशयीत आरोपी नराधाम शांताराम गायकवाड या
तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे
तालुक्यातील एका छोट्याशा गावात राहात असलेली मतिमंद 14 वर्षीय मुलगी तिचे आई-वडील व सर्व कुटुंबीय शेतात कामाला गेले असताना ती घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिचे वर 13 जुलै रोजी सकाळी शांताराम मदनसिंग गायकवाड याने तिला गावातील बकऱ्यांच्या वाड्यात घेऊन नेऊन तिथे तिथे तोंड दाबून तिचे वर अत्याचार केला दुपारी तिचे कुटुंबीय घरी आल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला व तत्काळ त्यांनी त्या मुलीला घेऊन यावल पोलीस ठाण्यात धाव घेतली. नराधाम शांताराम गायकवाड याचे विरुद्ध यावल पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर या करीत आहेत