भुसावळ – येथील महेशनगर भागातील धन्वंतरी भवन येथे गुरुपौणिमेनिमित्त बहिणाबाई महिला मंडळातर्फे गुरुवर्य व ज्येष्ठ यांच्यासह इतर मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी बहिणाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा दीपाली बऱ्हाटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्षा दीपाली बऱ्हाटे यांनी सांगितले की, गुरुवर्य हे आपले जीवनातील आदर्श आहे. त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. आज गुरुपौणिमेनिमित्त गुरुवर्यांसह ज्येष्ठांचा आशिर्वाद घेवून प्रेरणा निर्माण झाली, असेही त्यांनी मार्गदर्शनात सांगितले. आपले गुरुवर्य, आई-वडील, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह आदींचा बहिणाबाई महिला मंडळातर्फे अध्यक्षा दीपाली बऱ्हाटे यांनी सन्मान केला. यावेळी जया बोंडे, शशिकला झांबरे, ज्योती महाजन, गीता नारखेडे, वंदना सोनार, उज्ज्वला चौधरी, दीपाली कवाटे, शोभा झारखंडे, कमल चौधरी, सुनिता साळुंखे, प्रियंका साळुंखे, सुनीता वाणी, सविता सुरवाडे, नेहते, राणे, सुशिला तळेले, इंदू किरंगे,जीवन भंगाळे,कोमल पाटील,सरला फेगडे,मेघा वारके, जयश्री वडनेरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



