जिल्हा डायटचे अधिकारी यांनी अहिल्यादेवी कन्या विद्यालयात निपुण भारत (FLN) चाचणी घेतली ;

भुसावळ – येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथे नुकतेच डायटचे अधिकारी व्याख्याते शैलेश पाटील यांनी शाळेला भेट देऊन निपुण भारत (FLN)चाचणी क्रमांक एक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव व शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने निपुण भारत चाचणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळांमधून घेण्यात येत आहे कोरोनाच्या या कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये झालेली शैक्षणिक गुणवत्ता तपासणीसाठी शासनाने इंग्रजी गणित भाषा विषयांची निपुण चाचणी पहिली ते आठवीपर्यंतची घेण्यात येत आहे या अंतर्गत डायटचे व्याख्याते व जिल्हा बालरक्षक समन्वयक असलेले शैलेश पाटील यांनी नुकतीच शाळेला भेट देऊन वर्गाचे परीक्षण करून विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष चाचणीतील प्रश्न विचारलेविद्यार्थ्यांचा मिळालेला प्रतिसाद पाहून अधिकारी भारावले आणि त्यांनी विद्याथीनींशी हितगुज करून विशेष मार्गदर्शन करून धन्यवाद दिले

यावेळी .वर्गशिक्षक नाना पाटील सर शाळेचे पर्यवेक्षक संजीव पाटील सर यावेळी उपस्थित होते .डायटची व्याख्याते शैलेश पाटील सर यांनी निपुण भारत चाचणी विषयी शिक्षकांच्या अडीअडचणी समजून त्यांनाही योग्य ते मार्गदर्शन केले .