भुसावळ -येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयत नुकतीच पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा शाळेच्या सभागृहात संपन्न झाली .शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.पालक शिक्षक संघाचे सचिव जयसिंग पावरा सर यांनी मागील वर्षाचे उपक्रम व झालेला खर्च याचा हिशोब देऊन पालकांनी त्या विषयाला संमती देऊन मंजूर केले त्यानंतर 2022 23 साठी नवीन पालक शिक्षक संघाची कार्यकारणी पालकांमधून निवड करण्यात आली यामध्ये 20 पालक सहा शिक्षक व शाळेच्या मुख्याध्यापिका अश्या 27 जणांची निवड पालक शिक्षक संघात करण्यात आली . यावेळी शाळेच्या मुख्याध्यायिका यांनी शालेयशिस्त विषयी व वेगवेगळ्या उपक्रमांविषयी माहिती दिली काशीराम बारेला यांनी शाळेत घेतले जाणाऱ्या विविध परिक्षेविषयी माहिती दिली .विनोद उबाळे सर यांनी शालेय उपक्रम या विषयी सांगितले . यांनतर दहावीच्या परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार पालक शिक्षक च्या वतीने करण्यात आला . व्यासपीठावर मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी व शाळेचे पर्यवेक्षक संजीव पाटील सर होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयसिंग पावरा सर तर आभार पालक शिक्षक संघाच्या नुतन सचिव सोनाली राणे यांनी मानले .यावेळी पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते खेडीमेडीच्या वातावरणामध्ये पालक शिक्षक संघाची सभा यशस्वी झाली


