भुसावळ –
आज दिनांक 06.07.2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रेल्वे विभागीय सुरक्षा आयुक्त भुसावळ मंडळाच्या नेतृत्वाखाली सुमारे 120 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह युनिटी ऑफ रन काढण्यात आली रेल्वे संरक्षण दल यांनी सकाळी ७ .३० वाजता बॅरॅकमधून रनला सुरुवात केली तर ७.४५ वाजता रेल्वे क्रीडा मैदानावर येवून समारोप झाला .
दरम्यान सौ. एस केडिया विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नवीन पाटील , अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक रुक्मैंया मीना अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, क्षितिज गुरव
भुसावळ विभागातील विभागीय सुरक्षा आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते रेल्वे क्रीडा मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले . तसेच भुसावळ शहरामध्ये विविध ठिकाणी सुमारे 1000 वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान, रेल्वे संरक्षण दलाच्या बँडतर्फे संगीतमय आवाजात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा संदेश देन्यात आला , विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले तर रेल्वे संरक्षण दल/भुसावळ विभागासाठी रोख पारितोषिक जाहीर केले होते जनजागृती मोहीम राबवण्यात आली



