राज्यात सत्ता स्थापन ; भुसावळात भाजपा पदाधिकार्‍यांचा जल्लोष ; शिंदे समर्थकांचा सहभाग :

भुसावळ : राज्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर गुरुवारी शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यात स्थापन झाल्यानंतर भुसावळसह मुक्ताईनगर तालुक्यातील भाजप व शिंदे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली तर भुसावळात भाजपा पदाधिकारी थिरकले. यावेळी उपस्थितांना बुंदीच्या लाडूचे वाटप करण्यात आले.
राज्यात नवीन सरकार स्थापन होताच भारतीय जनता पार्टी, भुसावळ शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप चौकात फटाके फोडून तसेच लाडू वाटून जल्लोष केला याप्रसंगी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
भुसावळात जल्लोषप्रसंगी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, रमेश नागराणी, पिंटू ठाकूर, राजेंद्र आवटे, डॉ.नि.तु.पाटील, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, चंद्रशेखर इंगळे, लक्ष्मण सोयंके, अ‍ॅड.प्रकाश पाटील, शैलेजा पाटील, अनिता आंबेकर, गिरीश पाटील, राजू खरारे, बिसन गोहर, विनोद पचेरवार, नारायण रणधीर, नितीन सुराणा, अर्जुन खरारे, शंकर शेळके, जयंत माहुरकर, प्रा.विलास अवचार, भावेश चौधरी, प्रशांत देवकर, संजय बोचरे, कैलास झोपे, अ‍ॅड.अभिजीत मेने, जे.पी.शुक्ला, मंगेश पाटील, राहुल तायडे, रवींद्र दाभाडे, संतोष ठोकळ, अनिरुद्ध कुलकर्णी, सागर चौधरी, चेतन चौधरी, ईश्वर पवार, लव झाडगे, श्रेयस इंगळे, नंदकिशोर बडगुजर ,लोकेश जोशी, गोपीसिंग राजपूत, लखन रणधीर, चेतन सावकारे ,चेतन बोरोले, अथर्व पांडे, राहुल मेहरानी, विजय डोंगरे, प्रशांत भट आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

कुर्‍हा येथे फटाके फोडून जल्लोष
कुर्‍हाकाकोडा : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपि घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी कुर्‍हा येथे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष अजगर पठाण, ललित भागीरथी, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सोपान झाल्टे, अल्पसंख्यांक शिवसेना शहरप्रमुख शेख फारुख गोलू कांडेलकर, विनोद चौधरी, निखील भोलंकार, रामेश्वर ढोले, आकाश हिरोले, अमोल खिरलकर, शुभम कांडेलकार, रामचंद्र कोळी, गोपाल झाल्टे, रवी कदम, रीरतेश मूलतकार आदी शिवसेना व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.