भुसावळ – भुसावळ तालुक्यात साकरी येथे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा व तेलतोड योजना सन 2022-23 अंतर्गत खासदार श्रीमती रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या प्रेरणेतून जय मातृभूमी कृषी विकास शेतकरी उत्पादन कंपनी लिमिटेड साकरी तालुका भुसावळ यांच्या माध्यमातून तळवेल येथे शेतकऱ्यांना जे एस 2034 या नवीन संशोधित सोयाबीन बियाण्यांचे किट निःशुल्क वाटप करण्यात आले .
यावेळी तळवेल सरपंच डॉ. सुनिल पाटील, पंचायत समिती सभापती ज्ञानदेव झोपे , सरपंच इंदिराताई पाटील, ग्रा.प. सदस्य तुषार पाटील, प्रगतिशील शेतकरी अर्जुन इंगळे , जय मातृभूमी कृषी विकास उत्पादन कंपनी लिमिटेडचे चेअरमन किरण चोपडे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोमेश वारके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .



