भुसावळ : कोरोनाच्या काळानंतर प्रथमच रेल्वेचे जनरल तिकीट खिडकी बुधवार, 29 जूनपासून सुरू होत आहे. तिकीट खिडकीवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून विभागातील विविध रेल्वे स्थानकावर 35 नवीन तिकीट वेंडींग मशीन बसविण्यात आले असून 29 जूनपासून ते सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची तिकीटासाठी खिडकीवरील होणारी गर्दी कमी होणार आहे, अशी माहिती सिनीयर डीसीएम डॉ.शिवराज मानसपुरे यांनी दिली.
डीआरएम कार्यालयात मंगळवारी सिनियर डीसीएम डॉ. मानसपुरे यांचे केबिन मध्ये आयोजित पत्रकार परीषदेत माहिती देताना सिनियर डीसीएम बुधवार, 29 जूनपासून रेल्वे प्रशासनाकडून जनरल तिकीट खिडकी सुरू केली जात आहे.यामुळे प्रवाशांना वेळेवर तिकीट काढता येणार आहे. कोरोनाच्या काळानंतर तिकीट खिडकीवर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून संपूर्ण विभागात 35 नवीन तिकीट वेंडीग मशीन लावण्यात आल्या आहे, त्यांची चाचणी सुरू असून येत्या आठवड्यात ही चाचणी होवून प्रवाशांना तिकीट खिडकीवर न थांबता या मशीनवरून थेट तिकीट काढता येणार आहे. तसेच प्रवासी आता एक्सप्रेस, मेल गाडीने सुध्दा प्रवास करू शकणार आहे. सुमारे 45 लाख रूपयांचा खर्च या मशीनवर रेल्वेने केला आहे. जनरल तिकीट सुरू होणार असून यासोबतच अपडाऊन करणार्यांना पास दिला जाणार आहे. रेल्वेतर्फे पाच जुलैपासून ई-टेंडरींग सुरू होणार आहे. यासाठी आतापासूनच 50 टेंडर त्यावर टाकलेे आहे. यामुळे ऑनलाईन आता बोली बोलली जाणार आहे. अवघ्या दोन दिवसात टेंडरींगची प्रक्रीया पार पडली जाणार असून तत्काळ संबंधितांना कामे दिली जाणार आहे. यात पार्कीग, वेटींग रूम, पार्सल विभाग, टॉयलेट आदीचा समावेश आहे.

कुलींवर होणार कारवाई –
रेल्वे स्थानकावरील बॅटरी कार चालकास कुली मारहाण करतात म्हणून बॅटरी कार चालक प्रवाशांना बॅटरी कारमध्ये बॅगा अथवा पिशवी (लगेज सामान ) ठेऊ देत नाही , मात्र या बॅटरी कार मधून एकूण तीन प्रवासी व त्यांचे सोबत 60 किलो साहित्य प्रवासी त्या गाडीतून नेऊ शकतातअसा नियम आहे तरीही जर बॅटरी कार चालकाने यास नकार दिला तर थेट रेल्वेकडे तक्रार करावी आणि बॅटरी कार चालकांने प्रवाशांचे सामान कारमध्ये ठेवल्यावर कुली मारत असतील तर अश्या कुलींची माहिती घेऊन त्याचा परवाना कायम स्वरूपी रद्द करण्यात येईल असा इशारा डॉ.मानसपुरे यांनी यावेळी दिला आहे. बॅटरीकार चालक जर प्रवाशांकडून जास्त पैसे उकळत असेल तर त्यांनाही दंड करा, याबाबत संबंधित अधिकार्यांनी सरप्राईज व्हीजिट करून तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. तर प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रवाशांना अधिकाधिक सुविधा दिल्या जाणार आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, रेल्वे स्थानकाबाहेरील वाहन पार्कीग बाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत संबंधितांची चौकशी केली जाणार आहे, त्यांना दंड केला जाईल, टु व्हीलर व फोर व्हीलर दोन्ही पार्कीगची तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान यावेळी डीआरएम एस.एस. केडीया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भुसावळ विभागातील विविध कामांची माहिती दिली, भुसावळ जळगाव, जळगाव-ईगतपुरी, भुसावळ वर्धा या मार्गावरील तिसर्या लाईनीबद्दल माहिती दिली. अन्य विकास कामांची माहिती देत भुसावळ विभाग चांगला विभाग असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रवाशांच्या सुविधांना प्राधान्य देणार असल्याचे सांगून
डीआरएम एस.एस. केडीया यांनी
चैन पुलिंग हा अपराध असून प्रवाश्यानी चालत्या गाडीत चैन ओढू नये ,यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात , याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर तर होतोच मात्र त्याच बरोबर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . यासाठी नागरिकांनी प्रवसादरम्यांन चैन पुलिंग करु नये असे आवाहन केले .
यावेळी सिनियर डीसीएम डॉ.मानसपुरे, वरीष्ठ परीचालन प्रबंधक आर.के. शर्मा, जीवन चौधरी आदी उपस्थित होते.


