लेवा पाटीदार पंचायत समितीचे डिसेंबर अखेर गठन :

जळगाव :- भोरगाव लेवा पाटीदार ठाया पाडळसे ( ता.यावल ) यांची कार्यकारिणी व कुलसचिवांची मुदत डिसेंबर 2021 मध्ये संपली.
मात्र मध्यंतरी कोरोना काळ असल्याने नवीन समिती गठीत करण्याची कार्यवाही डिसेंबर 2022 अखेर करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.लेवा पाटीदार समाज बांधवांनी याबाबत नोंद घ्यावी ,असे भोरगाव लेवा पंचायतीचे प्रमुख व कुटुंबनायक रामेशदादा विठू पाटील यांनी पत्रकांवये कळविले आहे.