कंडारी शाळेत योगदिनी विविध योगासनांचे सादरीकरण :

जळगाव – तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत 21 जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योगासनांचे सादरीकरण शिक्षक व विद्यार्थ्यांनी केले.
प्रारंभी प्रार्थना म्हणून मानेच्या डावी-उजवीकडे हालचाली करून घेण्यात आल्या. त्यानंतर खांदा, कमर व पायाच्या हालचाली करण्यात आल्या. मंजुषा पाठक व ज्योती वाघ यांनी योगासनांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करवून घेतली. यावेळी मुख्याध्यापक संतोष वानखेडे, रमेश सूर्यवंशी, डॉ. जगदीश पाटील, साधना सूर्यराव आदी शिक्षकांनी सहभाग घेतला. ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन अशी दंडस्थितीतील आसने करण्यात आली. त्यानंतर दंडासन, भद्रासन, बद्धकोणासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, उष्ट्रासन, शशांकसन, उत्तान मण्डुकासन, वक्रासन अशी बैठक स्थितीतील आसने करण्यात आली. पोटावर झोपून मकरासन, भुजंगासन, शलशासन अशी आसने करण्यात आली तर पाठीवर झोपून सेतुबंध सर्वांगासन, उत्तान पादासन, पवनमुक्तासन, शवासन अशी आसने करण्यात आली. त्यानंतर कपालभाती आणि नाडीशोधन प्राणायाम, अनुलोम-विलोम प्राणायाम व भ्रामरी प्राणायाम करण्यात आला. सर्वात शेवटी ध्यान स्थितीतील ध्यान, संकल्प व शांतीपाठ करण्यात आला. योगासनांच्या सादरीकरणात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.