भुसावळ रेशन दुकानदार संघटना शहर अध्यक्षपदी आरिफ मिर्झा ;


भुसावळ – रेशन दुकानदार संघटना भुसावळ तालुकाध्यक्षपदी महेंद्र सपकाळे तर भुसावळ शहर अध्यक्षपदी आरिफ मिर्झा यांची एकमताने निवड भुसावळ येथील शासकीय विश्रामगृह येथे संघटनेची बैठकीत करण्यात आली. बैठकीमध्ये संघटनेचे जिल्हा सचिव सुनील अंभोरे हे सभेचे अध्यक्ष स्थानी होते व राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील संघटनेचे जिल्हा सचिव सुनील अंभोरे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख कैलास उपाध्याय आदी उपस्थित होते. तसेच पुढील कार्यकारणी या प्रमाणे तालुका उपाध्यक्ष सी. आर. पाटील तालुका सचिव उल्हास भारसके, तालुका संघटक ईश्वर पवार , तालुका सल्लागार नारायण वाणी , शहर उपाध्यक्ष राजेश सैनी यांची सर्व मताने निवड करण्यात आली याप्रसंगी भुसावळ शहरातील व ग्रामीण भागातील संघटनेचे सर्व रेशन दुकानदार बांधव उपस्थित होते .