शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह खाऊ वाटप : तीन दिवशीय भरगच्च कार्यक्रम : वृक्षारोपण व अन्नदान :


भुसावळ – भुसावळ शहर शिवसेनेतर्फे शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील भगीरथ प्राथमिक शाळा येथे 100 गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह खाऊ वाटप करण्यात आले .
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन , तालुका संघटक धीरज पाटील , शहरप्रमुख बबलू ब-हाटे , माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ , रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललित कुमार मुथा , विभाग प्रमुख अरुण साळुंखे , युवा सेनेचे माजी शहर प्रमुख मिलिंद कापडे , ज्येष्ठ शिवसैनिक हेमंत खंबायत , पवन मेहरा व पदाधिकारी उपस्थित होते .
याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्राचे संचालक उमाकांत शर्मा ( नमा शर्मा )यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले शहर शिवसेनेतर्फे समाजपयोगी कार्यक्रम राबवण्यात येतात आजचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे वेगवेगळ्या कार्यक्रमातून समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने शिवसैनिक नेहमीच प्रयत्नशील असतो यापुढेही असे समाजपयोगी उपक्रम शहर व तालुका शिवसेनेच्या मार्फत राबवणार आहोत अशी ग्वाही जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी दिली .
तर पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 27 जुलै येणाऱ्या वाढदिवसानिमित्त भगीरथी हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर तसेच शालेय गणवेश वाटप करणार असल्याचे नमा शर्मा यांनी यावेळी सांगीतले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगीरथी हायस्कूलचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.