भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यानी२१ जून हा योग दिन म्हणून साजरा केला, यावेळी योग शिक्षिका वृशाली गाडगीळ व प्रिन्सिपल नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना योग संदर्भात माहिती सांगितली.योगा केल्याने आपल्यात काय बदल होतात याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. रोज सकाळी किमान अर्धा ते एक तास योग करायला पाहिजे.
यावेळी कार्यक्रमाची
सुरवात ॐ कार प्रार्थनेने करण्यात आली.विद्यार्थ्यांना या वेळी भुजंग आसन,वृक्षासन, ताडासन,उत्तान पादासन, वक्रासन,चक्रासन, मत्स्यासन, शलभासन, सर्वांगासन, त्रिकोणासन तर प्राणायामचे प्रकार – भ्रसिका, अनुलोम-विलोम, कपाल भाती, शीतली शीतकारी,उज्जैय या प्रकारचे योगासन व प्राणायम घेऊन शांती मंत्राने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.शाळेतील शिक्षक व नॉन टीचींग कर्मचाऱ्यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
फोटो कॅप्शन – भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई ईग्लिश मिडीयम स्कूल मध्ये योगा करताना प्रिन्सिपल निना कटलर व इतर शिक्षक वर्ग.



