भुसावळ – राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल (इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम),भुसावळ. मधील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
इंग्रजी माध्यम मधील प्रथम क्रमांक कांडेलकर साहिल चंद्रशेखर 89.40% , द्वितीय क्रमांक कृष्णा विनोद चौरसिया 87% ,तृतीय क्रमांक नंदलाल दिलीप भोई 86.60% तसेच मराठी माध्यम मधील प्रथम क्रमांक मनुरे मयूर छोटू 90.20% , द्वितीय क्रमांक दिढे समृद्धी नितीन 89.80% , तृतीय क्रमांक अनुष्का नितीन बानाईत 87.80% या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक डॉ.संगीता बियाणी सेक्रेटरी यांनी केले तसेच मनोज बियाणी आणि रोनक बियाणि आणि शाळेचे मुख्याध्यापक रुद्रसेन गांठीया यांनी पेढा भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन पुढील
शैक्षणिक वाटचालीस साठी शुभेच्छा दिल्या.



