जळगाव जिल्ह्याचे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल इंगळे यांचे दुःखद निधन : आज अंत्ययात्रा

भुसावळ – जळगाव जिल्ह्याचे धडाडीचे, तसेच आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा दलित साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल आत्माराम इंगळे यांचे (वय ५७ वर्ष ) आज रोजी दिनांक १८ जून 2022 रोजी दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दिनांक १९ जून 22 रोजी सकाळी १०.०० वाजता रमाबाई आंबेडकर नगर येथील त्यांच्या बहीणीच्या घरून निघणार आहे, त्यांच्या पश्चात पत्नी- मुली, भाऊ ,बहिण, मेव्हणे असा परिवार असून ते पत्रकार राजेश तायडे यांचे वडील बंधू होत .