चार गाडीला लागले स्लिपर कोच ;

भुसावळ – मध्य रेल्वेने तत्काळ प्रभावाने पुढील गाड्यांना प्रत्येकी एक शयनयान कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

02187 रिवा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मुंबई उन्हाळी विशेष , 02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई- रिवा उन्हाळी विशेष.
सुधारित संरचना: एक प्रथम सह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

22157 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई-चेन्नई एग्मोर मेल.

22158 चेन्नई एग्मोर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई मेल

सुधारित संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी.

या गाड्यांच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांच्या पीएनआरची स्थिती तपासण्याची विनंती केली जात आहे.