भुसावळ :-महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची १८ वी १७ वर्षातील ( सब-जुनियर) गटातील मुले/ मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा जालना येथे २४ ते २६ जून २०२२ दरम्यान होणार आहे़, सदर स्पर्धेकरिता जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी रविवारी १२ रोजी सकाळी १०:३० वाजता आरपीडी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डी.एस.) मैदान भुसावळला होणार आहे.
३० जून २००५ नंतर व जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित राहावे ,अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल, रमण भोळे, प्रदीप साखरे, बी. एन. पाटील,मेघशाम शिंदे, गोपाल जोनवाल, प्रतीक कुलकर्णी, तन्मय दाभाडे , विकास पाटील, तारेख अहमद, राहुल कोळी,यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.



