बदलत्या काळातही प्रिंट मिडियाचे महत्व अबाधित : अॅड नितीन खरे –


भुसावळ : प्रसिध्दी माध्यमांचे कितीही प्रकार आले तरीही या बदलत्या काळातही प्रिंट मिडियाचे महत्व अबाधित राहील. असे मत सरकारी वकील व ज्येष्ठ पत्रकार अॅड. नितीन खरे यांनी व्यक्त केले.
येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी तर्फे आयोजित कार्यक्रमात ‘प्रिंट मिडियाचे महत्व’ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी क्लबचे ‌अध्यक्ष हरविंदरसिंग ठेठ्ठी, माजी सचिव विशाल शहा, प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. अॅड खरे पुढे म्हणाले की आज इलेक्ट्रॉनिक,सोशल व डिजीटल मिडीयाचा सर्वत्र बोलबाला आहे. पण विश्वासाहर्ता प्रिंट मिडिया टिकवून आहे. नव्या मिडीयावर कितीही बातम्या पाहिल्या तरी पेपर वाचल्याशिवाय समाधान होत नाही. त्यामुळे प्रिंट मिडियाचे अस्तित्व कोणीही मिटवु शकणार नाही. भुसावळ सारख्या शहरातुन काम करणाऱ्या पत्रकारांनी प्रिंट मिडीयात उत्कृष्ट काम करुन आपला वेगळा ठसा उमटवला आहे. असे खरे म्हणाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण, क्लबचे आगामी अध्यक्ष डॉ. मकरंद चांदवडकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रिंट मिडीयात काम करणाऱ्या पत्रकारांचा रोटरीचे माजी सहाय्यक प्रांतपाल चेतन पाटील, डॉ. नितीन दावलभक्त, मंगेश यावलकर, डॉ. प्रविण वारके, सोनु मांडे, पंकज भंगाळे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्लबचे अध्यक्ष हरीविंदरसिंग ठेठ्ठी यांनी प्रास्ताविक केले. प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी यांनी उपक्रमाची माहिती दिली. विशाल शाह यांनी आभार मानले. क्लबचे सचिव आशिष अग्रवाल, पुरुषोत्तम पटेल, रणजीत खरारे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.