रावेर – तालुक्यातील चिनावल,कुंभारखेडा,सावखेडे, गौरखेडा,लोहारा,अहिरवाडी,
निरुळ,पाडळा या भागात मोठ्या प्रमाणात वादळाचा तडाखा बसला आहे.ऐन कापणीवर आलेली शेकडो हेक्टरवरील केळी या वादळाने जमीनदोस्त झाली आहे.तर अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने रहदारी ठप्प झाली आहे.कुंभरखेडा येथील माध्यमिक विद्यालयातील किचनवरील पत्री वादळाने उडून गेली,तर गौरखेडा येथे देखील अनेक घरांवरील पत्रे उडाली आहे.
हिंगोणा येथे वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस

हिंगोणा येथे वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला साडेचार वाजेच्या सुमारास सुरुवात झाली यात ग्रामपंचायत परिसरातील झाड तसेच गावात काही ठिकाणी झाडे कोसळली यात काही घरांचे किरकोळ नुकसान झाले वादळी वाऱ्याने अनेक लोकांच्या घरावरील पत्रे सुद्धा उडाली वाऱ्यामुळे वीज पुरवठा देखील काही तास खंडित झाला होता .यात शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे सुद्धा नुकसान झाल्याचे वर्तविण्यात येत आहे .


