भुसावळात तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली :

भुसावळ – ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त येथील नाहाटा कॉलेज एन सी सी यूनिट आणि रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली , यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार रोजी सकाळी शहरात स्थानिक नाहाटा महाविद्यालया पासून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली .
या एनसीसी विद्यार्थ्यानीं रॅली मध्ये तंबाखूच्या सेवनाने आरोग्यासह जिवन नष्ट होते यांवर जंनजागृतीपर संदेश देणारे फलक घेवून तंबाखू व व्यसनापासुन दुर रहा असे आवाहन केले .यावेळी रॅली मध्ये रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली अध्यक्ष संजू भटकर , रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या सौ नूतन फालक , समाधान जाधव , एन सी सी अधिकारी मेजर स्मिता चौधरीं यांचेसह विद्यार्थी सहभागी झाले होते .