भुसावळ – तालुक्यातील वैद्यकीय सेवा व सुविधा सर्वसामान्य नागरिकांना सुलभ करण्यासाठी भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर च्या उर्वरित विकासकामांसाठी ४२१.९८लक्ष रुपयांच्या निधीचे विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते संपन्न झाला
कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील व खासदार रक्षा खडसे काही कारणास्तव अनुपस्थित होत्या
प्रसंगी साकेगाव प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मयूर चौधरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील नगरसेवक गिरीश महाजन, सतीश सपकाळे निकी बत्रा, सार्वजनिक बांधकाम विभाग भुसावळ उपविभागीय अधीक्षक बि डी तायडे शाखा अभियंता पि यू ठाकूर आदी मान्यवरांची उपस्थिती होती
तालुक्यातील भुसावळ ग्रामीण रुग्णालयात व ट्रामा केअर सेंटर मध्ये तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करत असताना
स्वतंत्र पी एम रुमचे बांधकाम, संरक्षण भिंत बांधकाम, कॉरिडोअर चे बांधकाम, फ्लॅग पोस्ट , पेवर ब्लॉक बांधकाम , अंतर्गत रस्ते, कार पार्किंग रोड, पंप हाऊस, बोरवेल, मेडिकल वेस्ट अशा विविध विकास कामांचे 421.९८ लक्ष रुपयांचे विकास कामांचे भुमी पुजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यामुळे भुसावळ तालुक्यातील वैद्यकीय सेवा-सुविधा सर्वसामान्य नागरिकांना सुलभ होईल आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल असा विश्वास आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केला .



