सामूहिक प्रयत्नानींच आपण व्यसनमुक्त पिढी आपण घडवू शकतो – एडीआरएम मीणा रुकमैय्या : भुसावळात धूम्रपान विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न ;


भुसावळ – सामूहिक प्रयत्नानींच व्यसनमुक्त पिढी आपण घडवू शकतो. तसेच व्यसनमुक्तीची चळवळ आपण प्रगल्भ करू शकतो. कुटुंबातील कर्ता व्यक्ती जर व्यसनाधीन झाला तर संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. म्हणून कुटूंबातील स्त्रियांनी सुद्धा आपल्या मुलांना आदर्श संस्कार दिले पाहिजे , कारण नारिशक्ती आदर्श संस्कारीत पिढी निर्मितीची जननी असल्याचे मत कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे भुसावळ रेल्वे विभागाचे अपर रेल्वे प्रबंधक मीणा रुकमैय्या यांनी व्यक्त केले . तसेच व्यसनमुक्तीसाठी महिलांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करून रेल्वे कर्मचा-यांनी व्यसनापासून दुर रहावे म्हणून सर्वोतोपरी काळजी घेतो,प्रसंगी त्यासाठी कुटुंबाला मदत करतोअसेही व्यसनमुक्तीवर जनजागृती व मार्गदर्शन करतांना श्री मीणा यांनी सांगीतले .
येथील आर्या फाऊंडेशन सक्षम सेवा फाऊंडेशन , मानवतकर बहुउद्देशीय संस्था , सक्षम नारी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शक्तींनी एकत्र येऊन व्यसनमुक्तीसाठी 31 मे धूम्रपान विरोधी दिनानिमित्त ३० रोजी पूर्वसंध्येला संध्याकाळी 7 वाजता लिम्पस क्लब हॉल 40 बंगला येथे जनजागरण कार्यक्रम घेतला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी एडीआरएम मीणा रुकमैय्या , आर्या फौंडेशनच्या डॉ वंदना वाघचौरे ,सक्षम नारी सेवा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुवर्णा गाढेकर , मानवतकर बहुउद्देशीय संस्थेच्या डॉ मधू मानवतकर , सक्षम फौंडेशन तसेच चिल्ड्रन कॉन्सलर आरती चौधरीं भुसावळ विभाग रेल कामगार सेनेचे अध्यक्ष ललित मुथा , एससी एसटी असोसिएशन अध्यक्ष सुधीर जंजाळे , शांताराम जाधव ,निंबाळकर ,महेश मीना,सिनियर स्टडी इन्स्पेक्टर भावना झा , नशाबंदी चंद्रकांत चौधरीं , अरुण तायडे , लता तायडे , यांचेसह रेल्वे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमांचे प्रारंभी दिवा पेटविल्यानंतर विझवता येत नाही दिपप्रज्वलना नंतर सर्वत्र प्रकाश पसरतो मात्र सिगारेट पेटवल्याने जीवनात अंधकार पसरतो म्हणून कार्यक्रमांचे प्रमुख अतीथी एडीआरएम रुकमैय्या यांचे हस्ते प्रतीकात्मक सिगारेट विझवून ” धूम्रपानाचा निषेध ” व्यक्त करुन कार्यक्रमास प्रारंभ झाला.

प्रस्ताविकात डाॅ. वंदना वाघचौरे यांनी समाजातील युवा वर्गात व्यसनांचे प्रमाण वाढत आहे, आईवडील व समाजाने या विषयी जागरुक होणे आवश्यक असल्याचे सांगून व्यसनांवरील उपचाराची माहिती दिली. तसेच व्यसनमुक्त केंद्र मार्फत व्यसनाधिन रुग्णावर उपचार केले जातात याबाबत सविस्तर माहिती देवून व्यसनमुक्त अभियानाचा वसा हाती घेतल्याचेही सांगीतले . तर डॉ मधु मानवतकर यांनी सिगारेट दारू व तंबाखू सेवनाचे तरुण पीढी व्यसनाधिन होत असून कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडत असल्याचे सांगीतले तंबाखू मुळे तोंडाचे कॅन्सर होतोच त्याचबरोबर ह्रदय , फुफ्फुस , लिव्हर यांवरसुद्धा दुष्परिणाम होत असल्याचे सांगून व्यसनांचा शरीरावर होणारा घातक परिणाम व त्या मुळे होणाऱ्या कॅन्सर विषयी माहिती दिली. तंबाखू , सिगारेट सोडा व्यसन करु नका असे आवाहन केले .
प्रसंगी आरती चौधरीं यांनी तंबाखू सेवनात पुरुषा बरोबर महिलांचे प्रमाण सुद्धा वाढत असल्याचे सांगून व्यसनांचा कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम कसा होत आहे बाबत सोदाहरणासह सविस्तर माहिती दिली व तंबाखू सिगारेट च्या वाईट व्यसनापासुन दूर रहा असा संदेश दिला .
दरम्यान प्रसंगी व्यसनमुक्तिवर आधारित अतिशय सुंदर व मार्मिक असे भारूड गीत धनश्री जोशी व दर्शन गुजराथी यांनी सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली.
31 में व्यसनमुक्ति दिनानिमित्त आयोजकांनीं व्यसनमुक्ती साठी जळगाव जिल्हास्तरीय स्पर्धा , घोषवाक्य ,पोस्टर बनवीने आदीं विविध स्पर्धा घेतल्या यामध्ये जवळपास 120 स्पर्धकांनीं सहभाग घेतला
पोस्टर स्पर्धेत – प्रथम नारायणी विसपुते , द्वितीय मुग्धा कोळंबे ,
कविता स्पर्धेत १)ऐश्वर्या सुरवाडे
२)वैभव बोंबै , ३)अशोक पारधे
स्लोगन घोषवाक्य १)शैला सावंत
२)पल्लवी अंबाडे , ३)साहील परदेशी, ४)शिशीर जावळे , ५) समाधान जाधव ,
निबंध स्पर्धेत – १)विनायक वाघ
२)सुनंदा सोनार , ३)रोशनी भिकम निकम , ४)आर्यन जाधव यांचेसह सहभागी स्पर्धकांना प्रमुख पाहुणे अपर रेल्वे प्रबंधक मीना रुकमैय्या यांचे हस्ते बक्षीस वितरण व सहभागाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .
कार्यक्रमांचे उत्कृष्ट सूत्रसंचलन व आभार डॉ सुवर्णा गाढेकर (सोनार ) यांनी मानले .
कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी,युवराज कुरकुरे,आकाश चौधरी,बॉक्सिंग कोच नरेंद्र मोरे,महिला नारी शक्ती संस्था अध्यक्ष अंजुम खान,पत्रकार उज्वला बागुल, सुनीता इंगळे,आशा पाटील समाधान जाधव,दीपक तायडे, निलेश सुर्यवंशी यांचेसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.