वृक्षसंवर्धनासाठी पर्यावरण सखी मंचतर्फे उपक्रम :सीड बॉल बनवण्यासाठी ४ जून रोजी कार्यशाळा :

भुसावळ – पर्यावरण दिनाच्या पाच जूनच्या
पूर्वसंध्येला चार जूनला मुलांना
पर्यावरणाचे, वृक्ष लागवड संवर्धन
याबद्दल माहिती व आवड निर्माण
व्हावी यासाठी सीड बॉल तयार
करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन
४ जूनला सायंकाळी पाच ते सात
यावेळात करण्यात आले आहे.
जामनेर रोडवरील पर्यावरण
सखी मंचच्या कार्यकारी अध्यक्षा
आरती चौधरी यांच्या निवासस्थानी
या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यामध्ये गोळ्यांमध्ये विविध
वृक्षांच्या बिया टाकून त्याचे बॉल
बनवायचे आहे. ते सुकल्यानंतर
पावसाळा सुरू होताच रस्त्याच्या
बाजूला जातांना टाकावयाचे
आहेत. जेव्हा पाऊस येईल तेव्हा या लागवड होईल.
यासाठी ५ ते १५ वयोगटातील मुलांनी जास्तीत जास्त संख्यने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले
आहे . सहभागी होणाऱ्यानी स्वाती प्रवीण
भोळे व शालिनी विजय वाढेकर
यांच्याशी संपर्क करून नाव नोंदणी
करावी, असेही कळविले
आहे.तसेच या कार्यक्रमासाठी फक्त २० मुलांचे नावे घेतली जातील, असेही
कार्यकारी अध्यक्षा आरती चौधरी
यांनी सांगितले आहे.