भुसावळात राज्यमंत्री बच्चु कडु यांचे सखी श्रावणी महीला संस्थेतर्फे जोरदार स्वागत :


भुसावळ – प्रहार संघटनेचे संस्थापक तथा राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण महिला व बालविकास, इतर मागास, बहुजन कल्याण विभाग कामगार राज्यमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु हे आज २७ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असतांना, भुसावळ येथे सखी श्रावणी महीला बहुउद्देशिय संस्था,भुसावळ तर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले .
प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल चौधरी यांचे निवासस्थानी राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट सखी श्रावणी महीला संस्थेच्या अध्यक्षा सौ राजश्री नेवे , यांनी भेट घेवून चर्चा केली प्रसंगी गुलाब पुष्पाचे रोपटे देऊन राज्यमंत्री यांचे स्वागत करण्यात आले ,
प्रसंगी अध्यक्षा सौ.राजश्री नेवे यांनी संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे विविध कार्य करीत असून ते आजतागायात अविरत पणे सुरु असल्याचे सांगितले . या‌वेळी, माया चौधरी, वंदना झांबरे, भाग्यश्री नेवे, स्मिता माहूरकर, कामिनि नेवे, निकीता खुशलानी, रसिका माहुरकर, उमेश नेवे यांचेसह पदाधिकारी उपस्थीत होते,