भुसावळ – येथिल क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या जयंती निमीत्त नियोजित जागेवर भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी महाराणा प्रताप यांच्या अर्धपुतळ्याचे पुजन केले.
गेल्या दोन दिवसांपासून काल रात्री पासून जयंतीची पुर्व तयारी करण्यात आली होती. पुतळा परिसरात रांगोळी काढून परिसर सुशोभीकरण करण्यात आले होते.
प्रसंगी आमदार संजय सावकारे यांनी महाराणा प्रताप यांच्या जिवनावर मार्गदर्शन केले.
या वेळी युवराज लोणारी, परीक्षित बऱ्हाटे,दामोदर राजपूत,चंदूसिंग चव्हाण रणजीत सिंग राजपूत,आनंदा पाटील, विक्रांत सिंह कुशवाह, विकी राजपूत, दलजीत चौधरी,किरण पाटील,सोनू राजपूत,शैलेश पाटील,संजीव पाटील,सोनी ठाकूर,अनुप ठाकूर,गोपी राजपूत,संदीप राणा, बबलुसिंग,विजय राजपूत,सुमित राजपूत,भागवत राजपूत,अनिल पाटील,पंकज राजपूत,अनिता आंबेकर,श्याम गोविंदा सह राजपूत व इतर समाज बांधव उपस्थित होते.



