भुसावळ - रेल्वे प्रवासा दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी आपातकालीन स्थितीत गाडी उभी करण्यासाठी धोक्याची साखळी ओढून गाडी उभी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र सध्या या सुविधेचा योग्य कारणाशिवाय वापर करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. धोक्याची साखळी' ओढून गाडी उभी केल्याने रेल्वे गाड्या विलंबीत होतात , त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतो, त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाचे आर्थिक नुकसान ही होते.
वैध कारणाशिवाय 'धोक्याची साखळी' ओढणे हा रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 141 नुसार दंडनीय अपराध आहे, ज्यासाठी रु. 1000/- पर्यंत दंड किंवा तीन महिने कारावास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. चेन पुलिंगच्या घटनांवर भुसावळ मंडळा कडूनही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दिनांक 08/05/2022 रोजी, भुसावळ विभागा द्वारे एकूण 04 प्रवाशां विरुद्ध योग्य/अनधिकृत मार्गाने धोक्याची साखळी ओढल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
म्हणून प्रवाशांना रेल्वे प्रशासना तर्फे नम्र विनंती करण्यात येते की प्रवाशांनी प्रवासा दरम्यान कोणत्याही वैध कारणा शिवाय धोक्याची साखळी ओढू नये. तसेच, आपणास जर कोणी धोक्याची साखळी ओढताना दिसला, तर त्याला पकडण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या हितासाठी काम करण्यास सदैव तत्पर आहे आणि आपल्या आदरणीय ग्राहकांनीही रेल्वे प्रशासनाला मदत करावी अशी अपेक्षा आहे.