भुसावळ –
क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीची पुर्व तयारी निमित्त भुसावळातील शासकीय विश्रामगृह मध्ये राजपूत समाजाची मिटींग आ७९योजित करण्यात आली होती. या वेळी मिटींग मध्ये क्रांतीसुर्य शिरोमणी महाराणा प्रताप यांची दि ९ मे रोजी जयंती निमित्त शोभायात्रेचे आयोजन भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयापासून संध्याकाळी सहा वाजेपासून करण्यात आले आहे. मिरवणूकीत डीजे,ऍक्टोपॅड सह बॅन्जो पार्टी सह सजवलेल्या बग्गीवर क्रांतीसुर्य महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅनर लावण्यात येणार आहे. शोभायात्रा मार्ग हा नाहाटा महाविद्यालय पासून जामनेर रोड,अष्टभुजा मंदिर,पांडूरंग टॉकीज, बाजारपेठ पोलीस स्टेशन समोरुण वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौक येथे समारोप करण्यात येईल.
शोभा यात्रेत राजपूत समाजातील महिला,पुरुष,बाल, गोपाल सह युवा वर्ग उपस्थित राहणार आहे. सर्व राजपूत समाज बांधवांनी आपल्या परीवारासह शोभायात्रेत उपस्थित राहण्याचे आवाहन दामोदर राजपूत,चंदूसिंग चव्हान,रणजीतसिंग राजपूत,नरविरसिंग राऊळ,विक्की राजपूत,सुरेश भोळे,गोपीसिंग राजपूत,विक्रांतसिह कुशवाह,वृत्तपत्र छायाचित्रकार श्याम गोविंदा सह समस्त राजपूत बांधवांतर्फे करण्यात आले आहे.
तसेच माजी नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी नगर पालीकेच्या माध्यमातून व स्वखर्चने महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची नियोजित जागेवरील ठीकाणी स्वच्छता, साफसफाई व रोषणाई करुण दिली आहे.
सोमवारी सकाळ पासून राजपूत समाज व इतर समाजातील नागरीकांची त्या ठीकाणी पुष्पहार अर्पण करण्याची गर्दी दिसून येईल.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्व ठिकाणी कार्यक्रमांवर बंदी असल्याने यंदा महाराणा प्रताप जयंती मोठया धुमधडाक्यात साजरी करण्यात येणार असल्याचे दामोदर राजपूत यांनी कळवीले आहे.



