भुसावळात धार्मिक सलोख्यासाठी पोलीस विभागातर्फे स्वाक्षरी अभियान संपन्न ; हजारों नागरिकांनी केली स्वाक्षरी ;


भुसावळ – येथे जातीय धर्मीय सलोखा कायम राहण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासना तर्फे सही/ संदेश मोहीम राबविण्यात आली. 7 रोजी आमदाराच्या सहीने या मोहिमेस प्रारंभ झाला.
जिल्हा पोलिस दलातर्फे नागरिकांमध्ये जातीय धर्मीय सलोखा कायम राहण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 7 मे पासुन सही /संदेश मोहीमेचा शुभारंभ झाला
आमदार संजय सावकारे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन , तालुक्याचे शेंडे यांचेसह शिशिर जावले , राजश्री नेवे, राजश्री सुरवाडे, रघुनाथ अप्पा सोनवणे , जे बी कोटेचा , मो मुन्नवर खान , राजू खरारे , राजू सूर्यवंशी ,शिशिर जावळे , तसेच पोलीस कर्मचारी, होमगार्ड, विविध राजकीय पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, हिंदु मुस्लीम नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. .
यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहिमेत सामाजीक, राजकीय, शैक्षणिक, शासकीय यासह विविध क्षेञातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला यासाठी बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर ,रजा टॉवर ,अष्टभुजा चौक / नाहाटा चौफुली ,भुसावळ रेल्वे स्टेशन पोलीस चौकी जवळ ,यावल नाका महात्मा गांधी पुतळ्याजवळ याठिकाणी नागरिकांनी स्वतःहून सही व संदेश लिहिले.