भुसावळ – येथील रेल्वे स्थानकाच्या आउटर भागात रांची एक्सप्रेस अज्ञात चोरट्याने १८ हजार रुपयांच्या ऐवजाची पर्स लांबविल्याची घटना ६ रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेक अली विमल राजेश पटेल (वय ४६, रा. प्लॉट नं. २३, सिडको महानगर , औरंगाबाद हे गाडी क्र. १८६०९ अप रांची एक्सप्रेसच्या डबा क्र. एस.१२ सीट क्र. ४९ वरुन रांची ते मनमाड असा प्रवास करत असतांना दि. ६ रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास गाडी भुसावळ स्थानकावरुन सुटत असतांना अज्ञात चोरट्याने पर्स लांबविली त्यात रोख दोन हजार, १६ हजार रुपयांचा मोबाईलसह चार एटीएम, आधारकार्ड, पॅन कार्ड असे महत्वाची कागदपत्रे लांबविली.

याबाबत पटेल यांनी मनगाड लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल केली. तेथून भुसावळ लोहमार्ग पोलिसात ‘शुन्य’ क्रमांकाने वर्ग करण्यात येवून अज्ञात आरोपी विरद्ध गु.र.नं. ३१२/ २२, भा.दं.वि. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एएसआय मधूकर पारधी करीत आहे.


