भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.ए.डी.गोस्वामी, प्रमुख वक्ते प्रा. डाॅ.दिपक शिरसाठ तर अध्यक्ष म्हणून प्रा.डाॅ.के.के.अहिरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.त्यानंतर प्रमुख वक्त्यांचा नॅपकिन व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख वक्ते डाॅ. दिपक शरसाठ यांनी असे प्रतिपादन केले कि, राजर्षी शाहू महाराजांनी सगळ्यांपेक्षा वेगळ्या सुधारणा कोल्हापूर संस्थानात केल्या. त्यांना 4थ्या शिविजींच्य आईने त्यांना दत्तक घेतले त्यामुळे त्यांना राजपद मिळाले. प्लेगच्या महाविदारक स्थितीत छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांना मोठ्या प्रमाणावर मदत केली. शाहू महाराज हे राजांमधले ॠषी व ॠषींमधले राजे होते. त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मूकनाय’ मासिकाला भरघोस आर्थिक मदत केली. पाणी अडवा, पाणी जिरवा यांसारख्या अनेक योजना कोल्हापूर संस्थानात निर्माण केल्या. महाराष्ट्राला पुरोगामित्व देण्यात त्यांनी खुप योगदान दिले.त्यांनी नेहमी संशोधनाला प्रोत्साहन दिले. बहुजनांच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक शिक्षण संस्था व वसतिगृहे निर्माण केली.
त्यानंतर आपल्या अध्यक्षीय समारोपात प्रा. डाॅ.के.के.अहिरे यांनी आपले विचार प्रकट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही.ए.सोळुंके यांनी, तर प्रास्ताविक प्रा. एस. टी.धुम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डाॅ. सौ.एम.व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डाॅ. एस.व्ही. पाटील, डाॅ.बी.एच.ब-हाटे, डाॅ.एन.ई.भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डाॅ.किरण वारके, प्रा. जितेंद्र आडोकार, प्रा.डाॅ.ललित तायडे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.



