मुंबई– बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्या ओ. बी.सी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी नुकतीच उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री ना. प्राजक्त दादा तनपुरे
यांची नुकतीच भेट घेवून याबाबत निवेदन दिले आहे .

लॉकडाऊन व कारोनाच्या महामारीच्या काळात अध्ययन अध्यापनात अनेक बदल झाले शासन स्तरावर झालेल्या निर्णया नुसार कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ व एम.एस.बी.टी.ई. बोर्डाच्या अंतर्गत शिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले गेले.त्यांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.संपूर्ण वर्षभरात शिक्षण ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही . तसेच विद्यार्थ्यानाही काही तांत्रिक अडचणीमुळे अध्ययनात अडथळे आलेले आहेत त्यामुळे ह्या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात असा विद्यार्थ्याचा सुर आहे . मागील दोन ते अडीच वर्षा पासुन लेखी अध्यापन बंद असल्याने पेपर लिहीण्यास अडचणी येण्याची भिती विद्यार्थी व पालक वर्गा मध्ये आहे. तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवु नये यासाठी यावर्षीच्या अंतिम परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्या यासाठी जिल्ह्याध्यक्ष ओ. बी.सी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेश नेमाडे यांनी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री ना,प्राजक्त दादा तनपुरे यांना कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि एम एस बी टी इ बोर्ड परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी भेट घेऊन निवेदन दिले.


