भुसावळात पुष्पा म्हणतो.. ‘मै थुकेगा नही’ माझी वसुंधरा उपक्रमातून
, स्वच्छता संदेशांनी भिंती झाल्या बोलक्या ;
भुसावळ : पालिकेने शहरात माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत रंगरंगोटी व भिंतीचित्रांवरुन स्वच्छताविषयक संदेश दिले आहेत. जळगाव रोड, जामनेर रोड, जलशुद्धीकरण केंद्र, नगरपालिका प्रशासकीय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान आदी ठिकाणच्या भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देणारी चित्र काढून भिंती बोलक्या केल्या आहेत.
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे अस्वच्छ शहर म्हणून भुसावळला डाग लागला होता. यानंतर स्वच्छतेवर भर देत पालिकेने ‘फास्टेट मुव्हर्स अॅवॉर्ड’पर्यंत झेप घेतली. मात्र, गेल्या दोन वर्षात स्वच्छ सर्वेक्षणातील कामगिरी पुन्हा सुमार राहिली. ही मरगळ झटकून आता पालिका कामाला लागली आहे.
आगामी काळात गुणानुक्रम वाढवण्यासाठी स्वच्छताविषयक उपक्रमांवर भर आहे. त्याचा एक भाग म्हणून शहरात माझी वसुंधरा उपक्रमातून जळगाव रोड, जामनेर रोड, जलशुद्धीकरण केंद्र, पालिका प्रशासकीय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या भिंतींवर स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे संदेश चित्रांतून रेखाटले आहेत. आगामी लोखंडी पूल व सतारे बोगदा, महामार्गावरील नवोदय विद्यालय वाय पॉइंट, नाहाटा चौफुली, शिवपूर कन्हाळे चौफुली, खडका चौफुली, साकरी फाटा परिसर, वरणगाव वाय पाउंडचा येथील अंडरपासला रंगरंगोटी करुन स्वच्छतेचा संदेश देणारी चित्रे काढली जाणार आहेत. नागरिकांची अधिक ये-जा असलेल्या भागात भिंती बोलक्या करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रबोधन होईल, असे स्वच्छ सर्वेक्षणाचे प्रमुख नितीन लुंगे यांनी सांगितले.
नियॉन, रेडियम कलर
रेल्वेचे दोन्ही बोगदे, महामार्गाच्या उड्डाणपुलांवर स्वच्छतेचा संदेश देणारी काढली जाणार आहेत. त्यासाठी नियॉन, रेडियम कलरचा वापर होईल. यासाठीचे दर मागवले आहेत. या वेगळ्या रंगांचा वापर केल्याने रात्रीच्या त्यावर प्रकाश पडल्यास ते चमकतील.
येथील अंडरपासला रंगरंगोटी करुन स्वच्छतेचा संदेश देणारी चित्रे काढली जाणार आहेत. नागरिकांची अधिक ये-जा असलेल्या भागात भिंती बोलक्या करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रबोधन होईल, असे स्वच्छ सर्वेक्षणाचे प्रमुख नितीन लुंगे यांनी सांगितले.



