प्रॅक्टिकल सुरू असतांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विद्यार्थ्याचा मृत्यू : प्रताप महाविद्यालयातील दुर्दैवी घटना –

अमळनेर : अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातील एम.एससीच्या विद्यार्थ्यांचा प्रॅक्टिकल सुरू असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली

नीलेश झांबरलाल पाटील (24, रा.विवेकानंदनगर, पिंपळेरोड, अमळनेर) एम.एस्सी.च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रसायनशास्त्र विभागात त्याचे प्रॅक्टिकल सुरू असताना अचानक त्याला चक्कर आली तो खाली कोसळला. विद्यार्थ्यांनी त्यास तत्काळ खाजगी रुग्णणालयात हलवले व तेथून ग्रामीण रुग्णालयात हलवले तेव्हा निलेश यास मृत घोषित करण्यात आले. डॉ.आशिष पाटील यांनी शवविच्छेदन केले.याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे