.
भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी धिरज पांडव यास
नेहरू युवा केंद्र जळगाव व स्कूल स्पोर्ट्स कराटे असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कराटे क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .
नरेंद्र जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्राचे निलेश सोनवणे यांचे हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले . यावेळी पुरस्कार समिती अध्यक्ष व पूजा सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
धीरज पांडव येथील अँड रमेश पांडव यांचे सुपुत्र असून
श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आहे त्याने शालेय जीवनापासून कराटे या खेळामध्ये जिल्हा पातळी, विभागस्तरीय , राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत विविध मेडल, पारितोषिक प्राप्त केली आहे .
धिरज याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल थायलंड मध्ये झालेल्या दि फ़्यूनाकोशी वर्ल्ड कराटे चैंपियनशिप कप ( The funakoshi World Karate championships Cup) या स्पर्धेत सहभाग घेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच इंडियन इंडिपेंडन्स आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप कप मध्ये ब्राँझ पदक प्राप्त केले .

याबाबत नेहरू युवा केंद्र यांनी धिरज पांडव याला पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले . या यशाबद्दल धिरज याचे प्राचार्य ,सर्व प्राध्यापक वर्ग तसेच
आई वडील तसेच भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष अँड तुषार पाटील , वकील संघ महिला अध्यक्षा अँड जास्वंदी भंडारी ,न्यू पॅन इंडिया सदस्य पत्रकार उज्वला बागुल , निरंजना तायडे , समुपदेशनच्या भारती मस्के. ॲड. प्रिया मॅडम, ॲड. भारमल, राजश्री सुरवाडे , अंजुम मॅडम, जयश्री इंगळे , सविता माळी, ॲड.खान सर, प्रफुल्ल निकम ,यांचेसह पॅन इंडियाचे सर्व सदस्य , मित्र परिवार व नातेवाईक यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.


