येत्या महिन्यात रमजान महिन्यात येणाऱ्या ईदच्या पार्श्वभूमीवर भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी खडका रोडवरील इदगाह मैदानाची पाहणी करून इदगाह कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांना आवश्यक सुचना दिल्या.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून मुस्लिम बांधवांना रमजान ईद साजरी करता आली नाही .यंदा मात्र शासनाने सर्व निर्बंध हटविल्याने रमजान ईद साजरी करण्यासाठी मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .
3 मे रोजी साजरी होणाऱ्या रमजान ईद निमित्ताने भुसावळ शहरातील खडका रोडवरील नवीन इदगाह मैदानावर नमाज अदा होत असते .त्या पार्श्वभूमीवर आज शनिवार रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी संपूर्ण मैदानाची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या .
यावेळी मुस्लिम मौलाना व इदगाह कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी ईदगाह कमिटीचे सेक्रेटरी अल्लाह बक्ष शाह ,डॉ रफिक अहमद खजांची हाजी रहिम शाह, हाजी शेख तस्लिम नजमोद्दीन , साजीद खान इऱ्हाक खान ,हाजी रहिमुद्दीन शब्बीर ताज मोहम्मद , रमजान शक्रुल्लाह, तस्लिम खान शफाअत खान ,अध्यक्ष डॉ महेमुद हुसेन आदी उपस्थित होते.



