चाळीसगाव -चाळीसगाव तालुक्यातील विसपुते व चव्हाण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.लग्नाच्या बसत्यासाठी जातं असलेल्या दोन सख्या भावांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.चाळीसगाव कोर्टात कारकून चे काम करणारे योगेश विसपुते आणि त्यांचे बंधू विशाल विसपुते या दोघां भावांचा बुलढाण्यातील मेहकरजवळ अपघात झाला.लक्झरी बसने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात योगेश विसपुते,विशाल विसपुते या सह सांगवीचा जिंदल चव्हाण हा युवकाचाही मृत्यू झाला आहे.

अल्टो कार आणि लग्झरी बसची टक्कर,लग्नाच्या बस्त्यासाठी जातं असतांना झाला अपघात
अपघातात मृत्यू झालेल्या विशाल विसपुते याचे येणाऱ्या 18 मेला लग्न होणार होते. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या गावातील मुली सोबत विशालचे लग्न ठरले होते. योगेश,विशाल आणि इतर तिन जण लग्नाच्या बस्त्यासाठी अल्टो कार ने जातं असतांना यांचा अपघात झाला.या अपघातात भावी नवरदेव विशालला काळाने घेरले.लग्नाआधीच विसपुते परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होतं आहे.या अपघातात जखमी झालेल्या इतर दोघांवर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहे.विशाल विसपुते चाळीसगाव कोर्टात वकिलांकडे कारकुनी काम करायचा त्याची घरची परिस्थिती बिकट असून त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.


