जळगाव – जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता नामशेष होणाऱ्या पक्षांना दाणापाणी देऊन जीवनदान मिळावे या उद्देशाने बहीणाबाई उद्यान येथे पक्षांसाठी परळ व धान्य वाटप करून जिवदान देण्याच्या उद्देशाने संवेदनशील भावनेतून हा स्तुत्य कार्यक्रम घेण्यात आला.
तीव्र उष्णता त्यात झाडांची उणीव अवती भोवती सिमेंटची जंगले यामुळे पक्षांची संख्या फारच कमी होत चालली आहे याकरीता उन्हाच्या तीव्रतेपासून पक्षांना वाचविण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संगोपन करून परळ द्वारा दाणापाण्याची सोय करावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महिला पर्यावरण सखी मंच अध्यक्ष मनिषा पाटील यांनी दिली .
प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ नीलिमा सेठीया व अध्यक्ष मनिषा पाटील यांच्या हस्ते परळ वाटप करण्यात आले.
यावेळी नेहा जगताप, किमया पाटील, नूतन तासखेडकर, माधुरी शिंपी, संजय साळुंखे, कविता पाटील, उल्का पाटे ,वैशाली शिरूडे, आशा मौर्य ,संगीता ठाकूर , रेणुका हिंगु ,शशी शर्मा, योगिता बाविस्कर ,पुनम पाटील, वंदना पाटील, तेजस्विता जाधव ,रंजना पावरा, नेहा पावरा आदीं उपस्थित होते . कार्यक्रमांचे सूत्रसंचलन पुनम पाटील यांनी केले तर आभार नूतन तासखेडकर यांनी मानले.
यशस्वितेसाठी सर्व आयोजक यांचे अनमोल सहकार्य लाभले.



