भुसावळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबीर : २५ रक्तदात्यांनी केले रक्तदान :


भुसावळ- येथील रक्तदाते सदस्य यांचे सौजन्याने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने १४ एप्रिल रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ घेण्यात आले .
या रक्तदान शिबिराचे आयोजन संचालक अक्षय अवसरमल व आकाश भालेराव यांनी केले .
यावेळी रक्तदान कार्यास निलेश फंड , यांचेसह रक्तदाते संस्थापक अध्यक्ष आकाश वानखेडे ,सागर तायडे , उमेश गिरी( पोलीस कर्मचारी ), आदित्य ,रोहित कालोचे, गणेश सपकाळे व अन्य भीम सैनिक उपस्थित होते .
या रक्तदान शिबीरात भुसावळ ब्लड बँकेचे महादेव मुळे , श्रद्धा परदेशी यांनी २५ रक्तबॅग संचय केल्या.