भुसावळ येथे शिवभोजन केन्द्रातर्फे डॉ आंबेडकर जयंती साजरी : मोफत शिवभोजन व मिठाई वाटप :


भुसावळ – महामानव,विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती या निमित्ताने भुसावळ शिवभोजनचे संचालक उमाकांत शर्मा यांचेतर्फे मोफत अन्नदान व मिठाई (बुंदी लाड़ू) वाटप करुन जयंती साज़री करण्यात आली .
प्रारंभी महामानव डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले
तदनन्तर मान्यवरांचे हस्ते शिवभोजन वाटप करण्यात आले. या शिवभोजना मध्ये 2 चपाती, वरण, भात, भाजी , बुंदीचे लाडू यांचा समावेश होता .
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, शिवसेना शहर प्रमुख नीलेश महाजन, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ ,संजय ब्राम्हणे, वरंणगांव शहर प्रमुख संतोष माळी, कांग्रेसचे प्रकाश निकम, जेष्ठ समाजसेवक जे बी कोटेचा राकेश खरारे , अरुण सालुंखे, अमजद खान, दर्शन मुंडे, सतनाम सिंह शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा(नमा) आदि उपस्थित होते .