भुसावळ – अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी मुंबई, पुणे आणि नागपूर येथील प्रत्येकी दोन आणि भुसावळ आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी एक अशा आठ मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना “महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार” दि. ११.४.२०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान केला.
मार्च २०२२ या महिन्यात कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यादरम्यानची सतर्कता, अनुचित घटना टाळण्यात आणि ट्रेन ऑपरेशन्समध्ये संरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेले योगदान याबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि रु. २०००/- रोख पुरस्कार आहे.

अत्नु विश्वास, लोको पायलट, कुर्ला, मुंबई विभाग, दि. ९.३.२०२२ रोजी ट्रॉम्बे यार्ड येथे कर्तव्यावर असताना, मालगाडीच्या शंटिंग दरम्यान तुटलेला ट्रॅक आणि फिशप्लेटचे नट-बोल्ट त्यांना दिसले आणि त्यांनी ताबडतोब ट्रेन थांबवली त्यामुळे अपघात टळला.
किरण विजय मोरे, उप स्थानक व्यवस्थापक, जांब्रुंग, मुंबई विभाग, कर्तव्यादरम्यान, पासिंग ट्रेन क्रमांक 22101 डाउन सह सिग्नलची देवाणघेवाण करत असताना, कोच क्रमांक B3 खाली आग लागली. त्यांनी तात्काळ ट्रेन थांबवण्याचा इशारा दिला आणि इतर कर्मचार्यांच्या मदतीने अग्निशामक यंत्राने आग विझवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
एम एस बाला, उप स्थानक व्यवस्थापक, खडकी, पुणे विभाग, यांना दि. १९.३.२०२२ रोजी कर्तव्यावर असताना इंजिनमधून ५व्या वॅगनमधून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी पॉईंट्समन आणि रनिंग स्टाफच्या मदतीने आग आटोक्यात आणली आणि संभाव्य दुर्घटना टळली.
विनेश कुमार, पॉइंट्समन, खडकी, पुणे विभाग, दि. १९.३.२०२२ रोजी कर्तव्यावर असताना इंजिनमधून ५व्या वॅगनमधून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या उप-स्थानक व्यवस्थापकासह आणि रनिंग स्टाफच्या मदतीने आग विझवली आणि संभाव्य दुर्घटना टळली.
विनय कुमार, ट्रॅक मेंटेनर-IV, जुन्नारदेव, नागपूर विभाग यांना दि. २०.२.२०२२ रोजी संरक्षा कुंपण तोडल्यानंतर ट्रॅकच्या मध्यभागी एक ट्रक दिसला. ड्युटीवर नसतानाही त्यांनी तत्काळ ट्रॅकला संरक्षण दिले आणि सर्व संबंधितांना सतर्क केले व सूचना दिल्या. त्यांच्या कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेमुळे ट्रेन क्रमांक 19344 ला छिंदवाडा येथे थांबवणे शक्य झाले आणि त्यामुळे मोठा अपघात टळला.
गगन बिहारी बरीक, गार्ड, नागपूर, नागपूर विभाग, दि. २३.२.२०२२ रोजी ट्रेन क्रमांक 12792 वर कर्तव्यावर असताना, अलार्म चेन पुलिंगमुळे ट्रेन थांबवली. तपासणीत त्यांना दुसऱ्या कोचच्या जंक्शन बॉक्समधून मागील बाजूने धूर निघत असल्याचे दिसले. प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर लगेच आग विझवण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दिलीप गुलाब चौहान, टेक्नीशीयन-१, खांडवा, भुसावळ विभाग, दि. ८.३.२०२२ रोजी “रोलिंग इन एक्झामिनेशन” कर्तव्यावर असताना, एका वॅगनमध्ये एक तुटलेला सीटीआरबी दिसला जो सीक (ठिक नसल्याचा) म्हणून चिन्हांकित होता. दि. १७.३.२०२२ रोजी, त्यांना पुन्हा एका वॅगनमध्ये सीबीसी जोखड (योक) तुटलेला दिसला जो ठीक नसल्याचे (सिक) चिन्हांकित केले होते. त्यांच्या उत्कट निरीक्षणामुळे संभाव्य दुर्घटना टळली.
सत्येंद्र कुमार, टेक्नीशियन-II, दौंड, सोलापूर विभाग, दि. २०.२.२०२२ रोजी “रोलिंग इन एक्झामिनेशन” ड्युटीवर असताना सीटीआरबी मधून दोन स्टड गायब आणि
ठीक नसल्याचे (सिक) म्हणून चिन्हांकित असलेल्या वॅगनमधील एक तुटलेली लॉकिंग प्लेट पाहिली. त्यांच्या उत्कट निरीक्षणामुळे अनुचित घटना टळली.
यावेळी संबोधित करताना अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, पुरस्कार विजेत्यांनी प्रशंसनीय काम केले आहे आणि संरक्षित कामासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेली २४ x ७ सतर्कता इतरांना प्रेरणा देईल आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करेल.
बी.के. दादाभोय, अतिरिक्त महाव्यवस्थापक; आलोक सिंग, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी , मुकुल जैन, प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक , अश्वनी सक्सेना, प्रधान मुख्य अभियंता , गोपाल चंद्र, प्रधान मुख्य विद्युत अभियंता ए. के. गुप्ता, प्रधान मुख्य मेकॅनिकल अभियंता, मनोज शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) आणि मध्य रेल्वेचे इतर प्रधान विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते आणि सर्व विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक या कार्यक्रमात व्हर्च्युअली सामील झाले.



