सहा वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार; एकावर गुन्हा दाखल :


भुसावळ – तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका गावात राहणाऱ्या ६ वर्षीय बालकावर एकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या ६ वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबियांसह राहतो. ३ एप्रिल रोजी दुपारी १२ ते १.३० वाजेच्या सुमारास मुलगा घरी असतांना संशयित आरोपी फैजल अश्फाक शेख याने मुलाला जवळ बोलावून नविन बॉल घेण्यासाठी २० रूपये देतो असे सांगून त्याच्या घरात घेवून गेला व त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

दरम्यान हा प्रकार मुलाच्या घरच्यांच्या समजल्याने त्यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयित आरोपी फैजल अश्फाक शेख याच्यावर बाल लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुमरा दळवी करीत आहे.