भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दोन महिण्यांसाठी समर कॅम्पचे (उन्हाळी शिबीराचे) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन महेश फालक व प्रिन्सिपल निना कटलर उपस्थित होते .
प्रारंभी महेश फालक यांनी फित कापून उद्घाटन करण्यात आले . यावेळी विद्यार्थ्यानी झुंम्बावर थिरकत आनंद लूटला तसेच विविध कलागुण सादर केले .
आजच्या स्पर्धेचे युग व ऑनलाइन शिक्षण प्रणाली मुळे विद्यार्थ्याचां शारिरीक विकास होत नाही म्हणून अश्या आशयाच्या या समर कॅम्पमुळे विद्यार्थ्यांचे विवीधांगी कलागुणांना वाव मिळतो विद्यार्थी आत्मनिर्भर होतो मैदानी खेळामुळे आरोग्या बरोबर कसदार शरीरयष्टि तयार होते. शारिरीक व बौद्धिक विकास होतो असे मत संस्थेचे चेअरमन महेश फालक यांनी व्यक्त केले .
शिबीर कालावधी दि ११ एप्रिल ते दि १० जून पर्यंत असून या शिबीरामध्ये तज्ञ शिक्षकामार्फत फुटबॉल,क्रिकेट,हॉकी,बॅडमिंटन,एथेलेटीक्स,बास्केटबॉल,
रिफ्रेशिंग कोर्स इंग्रजी-गणित-हिंदी,नृत्य, क्लेवर्क,इग्लीश बोलणे,पेंटिंग शिल्प,संगीत उपकरण,योगा,
मैदानी खेळ व इतर खेळांचे सराव करून घेतले जाणार आहे.
हे शिबीर ज्यूनीयर के जी पासून ९ वी पर्यंतच्या विदयार्थ्यासाठी आहे.
यावेळी भारती मेढे,गोपाल जोनवाल,संध्या बनसोड,अर्जुन सनस,विजय संकत,अकबर खान,प्रतीभा कोल्हे,अनिता कोळी,अनघा पाटील,प्रीती देशपांडे,महेंद्र सुर्यवंशी,स्मिता नन्नवरे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



