गोसेवक परिवाराचा स्तुत्य उपक्रम : मुक़्या प्राण्यांना पाणी पीण्यासाठी शहरात जलकुंड ठेवणार :

भुसावळ – माणूसकी धर्म पाळू या , मुक्या प्राणी यांना जगवु या, अशा विचारांनी प्रेरित होवून गोमातेचे रक्षण व्हावे , ४२ ते ४५अंश सेल्सियस च्या सर्वाधिक तापमानात मुक़्या प्राण्याची सुद्धा तहान भागावी , त्यांना पिण्यासाठी जागोजागी पाणी मिळावे याकरीता येथील गोसेवा परिवाराने गोप्रेमी लोकसहभागातुन मुक्या प्राण्या करीता सिमेंटचे तयार जलकुंड (पाण्याचे पात्र ) आणून गायत्री परिवाराच्या उपस्थितीत सदर जलकुंड शुक्रवार रोजी गोमातेसाठी व मुक़्या प्राणी यांचेकरीता लोकार्पण करण्यात आले .
स्थानिक गायत्री माता मंदिरा नजिक आयोजित कार्यक्रमास गायत्री परिवार सेवक तथा रेल्वे कर्मचारी राजेश गुप्ता , अॅड जास्वंदी भंडारी ,पत्रकार उज्वला बागुल , सौ राजश्री नेवे, उमेश नेवे यांचेसह गायत्री माता परिवार सेवक, शिवप्रतीष्ठान परिवार शिवआज्ञा परिवार व गोसेवक उपस्थित होते .
प्रारंभी गोसेवक रोहित महाले यांचे हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली . तसेच मंत्रोच्चारात जलकुंडाचे विधिवत पूजन करण्यात आले .
शहरातील विविध भागात जलकुंड लावण्यात येणार असून यामुळे वाढत्या तापमानात मुक्याजीवाची तहान भागणार आहे . गोप्रेमी नागरिक व गोसेवक यांनी लोकसहभागातुन
अत्यंत खडतर प्रवास करत जळगाव येथुन मोठ्या प्रमाणावर जलकुंड आणले आहे .
ज्या ठिकाणी मुक्या जीवाचे प्रमाण जास्त असते तिथे जलकुंभ बसविन्यात येवून मुक्या जीवाची तहान भागविणार आहे
प्रसंगी उपस्थित सर्व क्षेत्रातील महिलांनी गोसेवा परिवाराच्या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या व सहकार्याची ग्वाही दिली.
यावेळी माणसाप्रमाणे मुक्या जीवाना देखील पाणी आवश्यक आहे माणुसकी धर्म पाळुया
मुक्या जीवाना जगवुया याकरीता प्रत्येकाने आपआपल्या घरावर घरासमोर बादलीत वा मोठ्या भांडयात पाणी ठेवावे असे आवाहन गोसेवा परिवारातर्फे करण्यात आले . कार्यक्रम यशस्वितेसाठी गोसेवक रोहित महाले , भुषण महाजन रोहन बडेॅ कातीॅक कुलकणीॅ मयुर सावकारे प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले .